मुंबई

माहीम येथे अज्ञात तरुणाची हत्या

माहीम येथे एका अज्ञात व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह खाडीत फेंकून मारेकर्याने पलायन केले.

Swapnil S

मुंबई : माहीम येथे एका अज्ञात व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह खाडीत फेंकून मारेकर्याने पलायन केले. याप्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

१४ जानेवारी दुपारी तीनच्या सुमारास माहीम येथील रामगडच्या खाडी, पाईपलाईनजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती गस्त घालणार्या माहीम पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या व्यक्तीच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. त्याचे दोन्ही हातपाय बांधून त्याला खाडीत फेंकून देण्यात आले होते. हत्येनंतर मारेकर्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या