वसई-विरार महानगरपालिका 
मुंबई

वसई-विरारचा महापौर, उपमहापौर लवकरच ठरणार; ३०-३१ जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० किंवा ३१ जानेवारीपासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल आणि लोकनियुक्त कार्यकारी मंडळाच्या हाती महापालिकेचा कारभार जाणार आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ३० किंवा ३१ जानेवारीपासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल आणि लोकनियुक्त कार्यकारी मंडळाच्या हाती महापालिकेचा कारभार जाणार आहे.

१५ जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी ७१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर भाजप-शिंदे महायुतीला ४४ जागा मिळाल्या आहेत. यानंतर २२ जानेवारी रोजी महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून वसई विरारचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक बोलावण्यासाठीचा प्रस्ताव २३ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.

महापालिकेच्या बैठकीची तारीख पहिल्या २४-२५ जानेवारी दरम्यान निश्चित करून पीठासीन अधिकारी निश्चित केला जाईल आणि स्थानिक वर्तमानपत्रात त्याची सूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २७-२८ जानेवारी २०२६ रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र नगर सचिवांकडे सादर करायचे आहेत. अंतिम निवड गुप्त मतदानाद्वारे केली जाईल.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी