संग्रहित छायाचित्र
मुंबई

Vasai : अनधिकृत निमंत्रण पत्रिका : शिस्तभंगाची नोटीस; शहर अभियंता व उप अभियंत्यांवर कारवाई

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ए’ कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळा तसेच चंदनसार येथील ट्रॉमा सेंटरच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ए’ कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळा तसेच चंदनसार येथील ट्रॉमा सेंटरच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेप्रकरणी महापालिका प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

या प्रकरणी शहर अभियंता आणि उपअभियंता यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. दरम्यान, या विषयावर विरोधी पक्षनेते मनोज गोपाळ पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने याबाबत अधिकृत खुलासा केला. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती ‘ए’ कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आणि चंदनसार येथील ट्रॉमा सेंटरच्या विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका छापून वाटप झाल्याची माहिती महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाली होती. महापालिकेच्या म्हणण्यानुसार या निमंत्रण पत्रिका वसई-विरार शहर मनपाकडून अधिकृतरीत्या छापण्यात अथवा वितरीत करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा पत्रिका प्राप्त झाल्यास त्या अधिकृत समजू नयेत, असा खुलासा महापालिका आयुक्तांनी १२ मार्च २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. तसेच आयुक्तांची मान्यता न घेता निमंत्रण पत्रिका जाहीर केल्याचा तसेच राजशिष्टाचाराचे पालन न केल्याचा ठपका ठेवत शहर अभियंता व उप अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

WhatsApp च्या नव्या Username फीचरवर केंद्र सरकारची नजर; सायबर फ्रॉडचा धोका, 'मेटा' ला नोटीसची शक्यता

Navi Mumbai : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात उतरला करंट; स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी, Video

ठाकरे गटाने उमेदवारी मागे घेतली; सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

माहेरी गेलेली बायको परत आली नाही म्हणून मेहुणीलाच पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा, मेंदू, हृदयासह महत्त्वाचे अवयव गायब