Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी 
मुंबई

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

पूर्व व पश्चिमेला जोडणारा विद्याविहार उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वर्गीय पद्मश्री नाना पाटेकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी फलक झळकवत महापौर रितू तावडे यांना निवेदन दिले आहे.

Swapnil S

मुंबई : पूर्व व पश्चिमेला जोडणारा विद्याविहार उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वर्गीय पद्मश्री नाना पाटेकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी फलक झळकवत महापौर रितू तावडे यांना निवेदन दिले आहे. तर घाटकोपर येथील भाजपचे आमदार पराग शहा यांनी विद्याविहार उड्डाण पुलाला १८० विमान प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव देण्याची मागणी मुंबई पालिकेकडे केली आहे. मात्र त्याआधीच उड्डाणपुलाच्या नामकरणाचा वाद उफाळून आला आहे.

रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणारा विद्याविहार उड्डाणपूल मुंबई महापालिकेने बांधला आहे. दोन मार्गिका असलेल्या या पुलाची एकूण लांबी ६५० मीटर असून, रेल्वे रुळांवरून जाणाऱ्या भागाची लांबी सुमारे १०० मीटर आहे. उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय, तिकीट खिडकी, स्थानक मास्तर कार्यालय व जिन्यांची पुनर्बाधणी करण्यात आली आहे. जिन्याद्वारे पादचारी मार्ग उपरस्त्याला जोडण्यात आला असून, पुलावर ध्वनिरोधकही बसवण्यात आले आहेत. पालिकेने हा पूल १० ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, पुलावरील वाहतूक सुरू झालेली नाही. त्यातच पुलाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पालिकेकडे आग्रह

विद्याविहार उड्डाणपुलाला 'पद्मश्री दिवंगत नाना पाटेकर सेतू' असे नाव देण्यात यावे, अशी मागणी उबाठा गटाचे नगरसेवक सुनील मोरे, विभागप्रमुख तुकाराम पाटील केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन मागणीपत्र सादर केले. चित्रपटसृष्टीतील अभिनयासोबतच 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून शेतकरी आणि गरजू नागरिकांसाठी नाना पाटेकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने त्यांच्या नावाची मागणी करण्यात आल्याचे उबाठाचे विधानसभा प्रमुख प्रकाश वाणी यांनी सांगितले. दरम्यान, घाटकोपरचे भाजप आमदार पराग शाह यांनी विमान प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याच्या गौरवासाठी त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे सादर केला.

५३ कुटुंबांचे विस्थापन टळले

मुंबई : विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील पोहोच रस्त्याची रेषा वळवून ५३ सदनिकाधारकांचे विस्थापन टाळण्यात आले आहे. मात्र, या बदलामुळे पोहोच रस्त्याच्या बांधकाम खर्चात तब्बल १० कोटी ६२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या कामाचा खर्च ९५ कोटी ५५ लाख रुपयांवरून १०६ कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड