Mumbai : व्ही. एन. देसाई रुग्णालयात दोन वर्षे राबला बनावट डॉक्टर; मानवाधिकार आयोगाची महापालिका आणि डीसीपींना नवी नोटीस 
मुंबई

Mumbai : व्ही. एन. देसाई रुग्णालयात दोन वर्षे राबला बनावट डॉक्टर; मानवाधिकार आयोगाची महापालिका आणि डीसीपींना नवी नोटीस

सांताक्रूझ येथील बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित व्ही. एन. देसाई रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) एक विनानोंदणी डॉक्टर एका तृतीय पक्ष कंत्राटदाराच्या माध्यमातून सुमारे दोन वर्षे कार्यरत होता.

अमित श्रीवास्तव

अमित श्रीवास्तव/मुंबई

सांताक्रूझ येथील बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित व्ही. एन. देसाई रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) एक विनानोंदणी डॉक्टर एका तृतीय पक्ष कंत्राटदाराच्या माध्यमातून सुमारे दोन वर्षे कार्यरत होता. त्याच आरोपावरून मानवाधिकार आयोगाने पालिका प्रशासन आणि पोलीस उपायुक्त (झोन-८) यांना नवी नोटीस बजावली आहे.

ॲॅडव्होकेट तुषार भोसले यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भोसले यांनी कंत्राटदार भारत चंद्रकांत सावंत, नर्सिंग होम आणि रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’च्या वैध नोंदणीशिवाय सावंत यांना काम करू दिल्याबद्दल प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सावंत यांच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हे प्रकरण पहिल्यांदा समोर आले. अहवालानुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात झाली होती आणि त्यांनी आयसीयूमध्ये रजिस्ट्रार म्हणून काम केले. सावंत यांनी वैध एमएमसी नोंदणी प्रमाणपत्राऐवजी प्रॅक्टिस करण्यासाठी अधिकृत असल्याचे पत्र सादर केल्यावर कर्मचाऱ्यांना संशय आला.

कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस

या निष्कर्षांनंतर नोव्हेंबर २०२४ पासून कंत्राटदाराचे पेमेंट रोखून धरण्यात आले असून कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टरांकडे वैध पात्रता, नोंदणी असणे आणि लागू वैद्यकीय कायद्यांचे पालन करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असल्याचे कराराच्या अटींनुसार रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग