वेलंकणी यात्रेसाठी पश्चिम रेल्वेकडून चार विशेष गाड्या; १० ऑगस्टपासून आरक्षण सुरू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

वेलंकणी यात्रेसाठी पश्चिम रेल्वेकडून चार विशेष गाड्या; १० ऑगस्टपासून आरक्षण सुरू

वेलंकणी मातेच्या सणासाठी तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या ख्रिस्ती भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेने यंदा चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

वसई : वेलंकणी मातेच्या सणासाठी तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या ख्रिस्ती भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता पश्चिम रेल्वेने यंदा चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील भाविकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असून, या निर्णयामुळे वसईकर ख्रिस्ती भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वेलंकणी मातेचा वार्षिक सण (नोव्हेना) २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. या उत्सवासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक तामिळनाडूमधील वेलंकनी येथे जातात. त्यामुळे महाराष्ट्र वेलंकणी यात्रेकरू संघटनेच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनस-वेलंकणी आणि वलसाड-वेलंकणी -डहाणू रोड या मार्गावर चार विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांसाठी १० ऑगस्टपासून तिकीट आरक्षण सुरू होणार आहे.

वापी आणि डहाणू रोड येथे अतिरिक्त थांबा

या गाड्या बोरिवली, वसई रोड, पालघर, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, वाडी, रायचूर, रेणिगुंटा, काटपाडी, तिरुवन्नमलाई, व्हिल्लुपुरम, मयिलादुथुराई आणि नागपट्टिनम या स्थानकांवर थांबणार आहेत. ट्रेन क्रमांक ०९०६१ ला वापी आणि डहाणू रोड येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे वसई, विरार, भाईंदर आणि परिसरातील ख्रिस्ती भाविकांना वेलंकणी यात्रेसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक

ट्रेन क्रमांक ०९०५९ (वांद्रे टर्मिनस- वेलंकणी )

२७ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटेल. ही गाडी अनुक्रमे २९ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०५ वाजता वेलंकणी येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०९०६० (वेलंकणी -वांद्रे टर्मिनस)

३० ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता वेलंकणीहून सुटेल. ही गाडी अनुक्रमे ३१ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०९०६१ (वलसाड-वेलंकणी)

६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.४० वाजता वलसाडहून सुटेल आणि ८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०५ वाजता वेलंकणी येथे पोहोचेल.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : दुचाकींसाठी १० ऑगस्टपासून नवीन नोंदणी; एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास दुपारी लिलाव

Nashik : भाजप नेते विजय चौधरींना अटक; महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा भोवली

विद्यार्थ्यांचे प्रकल्प पेटंटमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण

... तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

Mumbai : मुलाच्या हत्या प्रकरणातून वडिलांची निर्दोष मुक्तता; तपासात गंभीर त्रुटी, कोणतेही ठोस पुरावे नाहीत