ऐतिहासिक वास्तूंमध्ये बाळासाहेबांचा पुतळा अन् हुतात्मा स्मारकाचा समावेश करा! स्थायी समितीत यशोधर फणसे यांची सूचना  
मुंबई

Mumbai : ऐतिहासिक वास्तूंमध्ये बाळासाहेबांचा पुतळा अन् हुतात्मा स्मारकाचा समावेश करा! स्थायी समितीत यशोधर फणसे यांची सूचना

मुंबईतील फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वास्तुंची देखभाल, दुरुस्तीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामा प्रसाद मुखर्जी चौक येथील पुतळा आणि हुतात्मा स्मारकाचा यादीत समावेश करण्यात यावा, अशी सूचना ठाकरे सेनेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी केली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वास्तुंची देखभाल, दुरुस्तीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र, या प्रस्तावात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा श्यामा प्रसाद मुखर्जी चौक येथील पुतळा आणि हुतात्मा स्मारकाचा यादीत समावेश करण्यात यावा, अशी सूचना ठाकरे सेनेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी केली.

फणसे यांच्या सूचनेला समर्थन दिल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या यामिनी जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच ऐतिहासिक वास्तूंची देखभाल योग्य प्रकारे होते की नाही याची तपासणी करण्यासाठी तिसऱ्या पार्टीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी यामिनी जाधव यांनी यावेळी केली.

कुलाबा येथील श्यामा प्रसाद मुखर्जी चौक येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे, या पुतळ्याचा यादीत उल्लेख नाही, त्यांचे नाव नाही, हुतात्मा स्मारक आहे, त्याचाही यादीत समावेश नाही.

संबंधित प्रस्ताव मंजूर

फणसे, यामिनी जाधव, मकरंद नार्वेकर यांनी यावेळी विविध सूचना केल्या, त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. हुतात्मा चौक पालिकेची जबाबदारी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुतळा, हुतात्मा स्मारकाबाबत काटेकोर माहिती घ्यावी, असे सांगत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

Mumbai : पॅकिंग खर्च वाढल्याने मसाल्यांचे दर वाढणार; अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयाचे पडसाद

नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ४५ हजारांचे सानुग्रह अनुदान; महासभेची मंजुरी

जयशंकर, रुबिओ यांच्यात २० ऑक्टोबरला चर्चा होणार; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाचा आरोप; IAS अधिकाऱ्याच्या चौकशीचे जम्मू-काश्मीर सरकारचे आदेश

Mumbai : महसूल अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा दणका; पुनर्विकास रखडल्याबद्दल ७ लाखांचा दंड