NEET UG 2026 Re-Exam : २.७९ लाख विद्यार्थ्यांची ‘नीट’ फेरपरीक्षेला ‘दांडी’ प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

NEET UG 2026 Re-Exam : २.७९ लाख विद्यार्थ्यांची ‘नीट’ फेरपरीक्षेला ‘दांडी’

नीट-यूजी २०२६ फेरपरीक्षा २१ जून रोजी घेण्यात आली, मात्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण २२.७९ लाख उमेदवारांपैकी तब्बल २.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नीट-यूजी २०२६ फेरपरीक्षा २१ जून रोजी घेण्यात आली, मात्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण २२.७९ लाख उमेदवारांपैकी तब्बल २.७९ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे वृत्त आहे. फेरपरीक्षेचा निकाल आगामी २० जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) तात्पुरत्या उत्तरतालिकेवरील हरकतींचा आढावा घेतल्यानंतर आता मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या ३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत पेपरफुटीचे आरोप झाल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण २२.७९ लाख उमेदवारांपैकी सुमारे २० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास ८८ टक्के होती, जी मूळ परीक्षेतील ९६ टक्क्यांहून अधिक उपस्थितीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. पेपरफुटीच्या वादामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि अल्प कालावधीत पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याचे आव्हान, या कारणांमुळे उपस्थिती घसरल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई