राष्ट्रीय

२०२१मध्ये जगात २०० पर्यावरणवाद्यांची हत्या

२०२०मध्ये मेक्सिकोमध्ये ३० पर्यावरणवाद्यांना ठार मारण्यात आले होते.

वृत्तसंस्था

२०२१मध्ये कोरोनाचे संकट जगावर घोंघावत असतानाही तब्बल २०० पर्यावरणवादी तसेच भूमी संरक्षण कार्यकर्त्यांच्या हस्ताय करण्यात आल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती ग्लोबल विटनेस या संस्थेच्या वार्षिक अहवालाद्वारे उघड झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक ५४ जणांची हत्या ही मेक्सिको देशात करण्यात आली आहे.

तीन चतुर्थांशपेक्षा जास्त हत्या लॅटिन अमेरिकेत घडल्या आहेत. कोलंबिया, ब्राझील आणि निकाराग्वा या देशांमध्येही दोन अंकी मृत्यूची नोंद झाली आहे. २०२०मध्ये मेक्सिकोमध्ये ३० पर्यावरणवाद्यांना ठार मारण्यात आले होते. सलग तिसऱ्या वर्षी मेक्सिकोमधील संख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात झालेल्या हत्येची नोंद नसल्यामुळे हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

खाणकामातील संघर्षामुळे तब्बल २७ पर्यावरणवाद्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एखाद्या क्षेत्रातील ही सर्वाधिक मृत्यूंची नोंद आहे. यापैकी १५ घटना या एकच्या मेक्सिकोमधील आहेत. जमिनीच्या वादातून तसेच एखाद्या प्रकल्पावरून हत्या करण्यात आल्याची संख्याही सर्वाधिक आहे. मेक्सिकोच्या पश्चिमेकडील जालिस्को राज्यात होजे सँटोस आयझॅक चावेझ यांची एप्रिल २०२१ मध्ये हत्या करण्यात आली. एका निवडणुकीसाठी ते कार्यरत असताना त्यांनी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणीला विरोध केला होता. मात्र निवडणुकीच्या काही दिवसआधी त्यांच्या कारमध्येच त्यांचा मृतदेह आढळला होता.

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

अर्बन कंपनी, बोट ब्रँडच्या मूळ कंपनीला IPO लाँच करण्यासाठी सेबीची परवानगी; १३ कंपन्या एकत्रितपणे १५,००० कोटी उभारणार

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी