Himachal Pradesh : सिमल्यात ७२ तासांत ७० हजार वाहनांची एन्ट्री 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Himachal Pradesh : सिमल्यात ७२ तासांत ७० हजार वाहनांची एन्ट्री

देशातील मैदानी भागांमध्ये सध्या उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या कडक उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी पर्यटकांनी हिमाचल प्रदेशातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणांकडे धाव घेतली आहे.

Swapnil S

सिमला : देशातील मैदानी भागांमध्ये सध्या उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या कडक उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी पर्यटकांनी हिमाचल प्रदेशातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणांकडे धाव घेतली आहे. गेल्या २४ दिवसांत तब्बल ६ लाख ३१ हजार वाहने सिमल्यात दाखल झाली असून, गेल्या ७२ तासांत ७० हजार वाहनांची नोंद झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

उन्हाळी पर्यटनाचा सीझन अजून पूर्णपणे सुरू व्हायचा असतानाच, 'टेकड्यांची राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमला शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, सिमला पोलिसांनी पर्यटकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि जबाबदार नागरिक म्हणून वर्तन करण्याचे विशेष आवाहन केले आहे.

पार्किंगची समस्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ दिवसांत चंदीगड-काल्का मार्गाने ३ लाख ७० हजार वाहने सिमल्यात आली, तर मोठ्या संख्येने वाहने किन्नौर, बिलासपूर आणि कुलू मार्गे शहरात दाखल झाली. "पर्यटकांच्या या अचानक वाढलेल्या संख्येमुळे सिमल्यातील पार्किंगच्या जुन्या आणि गंभीर समस्येत आणखी भर पडली आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला दिली.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन