राष्ट्रीय

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी ; अनेकजण बेशुद्ध

काल देखील शास्त्री यांच्या कथा वाचनावेळी सुरक्षा रक्षकांनी काही भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता

नवशक्ती Web Desk

ग्रेटर नोएडातून बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. शास्त्री यांच्या दर्शनासाठी आलेली गर्दी अनियंत्रित झाली आणि अनेक लोक बेशुद्ध पडले. यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.

काल देखील शास्त्री यांच्या कथा वाचनावेळी सुरक्षा रक्षकांनी काही भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या लोकांवर सुरक्षेची जबाबदारी होती. त्यांनीच भक्तांसोबत बाचाबाची झाल्यावर त्यांच्या एकामगोमाग कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला होता. काही लोकांनी मध्यस्थी करत भक्तांना यातून सोडवलं होतं. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हारल झाला होता.

यातचं आज बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात खुप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची श्रीमद भगवद गीता कथा सुरु आहे. बुधवारी दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने दरबारातील भाविक नाराज झाले. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक बेशुद्द झाले. यावेळी अनेकांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.

तरुण तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

Mumbai : माझगावच्या गणपती मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप; २२ वर्षीय तरुणाला अटक

Mumbai : बीकेसीतील 'एमसीए'च्या ५ उपाहारगृहांचे परवाने रद्द; FDA चा दणका; कारवाई सुरूच

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले

गर्लफ्रेंडने कारवर उमटवले ३४०० 'किस'; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तरुणाला ५,५०० रुपयांचा दंड