नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीला विरोध करणाऱ्या आपल्या आंदोलनाची फ्रान्स, नेपाळ आणि बांगलादेशातील हिंसक आंदोलनांशी तुलना करण्यास कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंगळवारी नकार दिला. त्यांचे सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गावर चालत द्वेषापेक्षा शांततेची निवड केली आणि ते दिपके यांनी सणासुदीच्या काळात कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्याचवेळी तुरुंगातील सहकारी दास आणि रांका यांची आठवण ठेवण्यासही त्यांनी सांगितले. तुरुंगात असल्यामुळे या दोघांना आपल्या प्रियजनांसोबत सण साजरा करता येणार नाही. आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे संबंधित कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले.
दास, रांका कोठडीविरोधात हायकोर्टात धाव
कोक्रोच जनता पक्षाचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी त्यांच्या वाढीव न्यायालयीन कोठडीविरोधात तातडीने सुनावणी व्हावी यासाठी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
'मोफत प्रसिद्धी'बद्दल मानले आभार
दिल्लीतील एका रामलीला उत्सवात रावणासोबतच ३० फूट उंच 'झुरळाचे' (कॉकरोच) पुतळे जाळण्याची घोषणआ करण्यात आली. त्यावर कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक दिपके यांनी या आयोजकांचे ‘मोफत प्रसिद्धी’ दिल्याबद्दल आभार मानले आहेत.