Kolkata : अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर 
राष्ट्रीय

Kolkata : अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावर बुलडोझर

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या आमताला येथील पक्ष कार्यालयावर दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाने शनिवारी मोठी कारवाई केली.

Swapnil S

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या आमताला येथील पक्ष कार्यालयावर दक्षिण २४ परगणा जिल्हा प्रशासनाने शनिवारी मोठी कारवाई केली. आवश्यक मंजुरी न घेता आणि बांधकाम नियमांचे उल्लंघन करून हे कार्यालय उभारण्यात आल्याचे कारण देऊन प्रशासनाने बुलडोझरचा वापर करून हे इमारत पाडण्याचे काम सुरू केले. शनिवारी सकाळपासूनच या परिसरात पोलीस आणि केंद्रीय दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सुरक्षा कठडे (गार्ड रेल्स) लावून संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला होता. दुपारी १२ च्या सुमारास तीन बुलडोझर घटनास्थळी आणण्यात आले.

प्रशासनाने सुरुवातीला कार्यालयासमोरील शेड हटवले आणि त्यानंतर इमारतीचा समोरील भाग पाडण्यास सुरुवात केली. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी हजर होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Air India Express : ३६,००० फूट उंचीवर तांत्रिक बिघाड; अबुधाबीला जाणारे विमान कोचीला परतले, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : क्षणार्धात इमारत जमीनदोस्त; मृतांचा आकडा वाढला, थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ समोर

"कचरा का टाकला?" म्हणणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; विरारमध्ये महिला गोविंदा पथकाचा राडा, Video

Bigg Boss 20: जेन-झी आंदोलनामुळे गाजलेली रिया अहिर अवघ्या २ मिनिटांत शोमधून बाहेर; लव गिलने मारली बाजी, पाहा स्पर्धकांची यादी

रत्नागिरी : गणपतीपुळे बीच पर्यटकांसाठी पुन्हा खुला