राष्ट्रीय

अनौरस अपत्यालाही वडिलोपार्जित संपत्तीत हक्क

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : बेकायदा विवाहातून जन्मलेल्या किंवा कायदेशीररित्या वारस नसलेल्या, किंवा विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या अनौरस अपत्याला त्याच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कायदेशीर वारसांप्रमाणे हक्क असेल, असा महत्वपूर्ण निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या मुलाला असणारा हक्क हा त्याच्या वडिलांच्या हिश्यातून मिळेल. म्हणजे मूळ हिस्से झाल्यानंतर त्याच्या वडिलाच्या वाटेला जो हिस्सा येईल, त्यामध्ये अशा मुलाचा एक हिस्सा असेल, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल देताना सांगितले की, अवैध आणि रद्द विवाहातून जन्माला आलेल्या मुलांनाही पालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळेल. सुप्रीम कोर्टाने अशा मुलांनाही कायदेशीर वारसांसोबत हिस्सा मिळायला हवा, असे म्हटले आहे. अशा प्रकारे, हिंदू विवाह कायद्याच्या कलम १६ (३) ची व्याप्ती आता वाढवली जाईल. ११ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने एक खटला निकाली काढला आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस