PMO वर अरविंद केजरीवाल आज काढणार मोर्चा  (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

PMO वर अरविंद केजरीवाल आज काढणार मोर्चा

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या सक्तीविरोधात आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ई२० इंधनाविरोधातील नागरिकांच्या सह्यांचे अर्ज सुपूर्द करण्यासाठी मंगळवारी १०० कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी सोमवारी केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकार हा निर्णय लादतोय, असा आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सातत्याने वाढवण्यामागे सरकारचा काहीतरी 'गुप्त अजेंडा' आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना ई२० इंधनामुळे वाहनांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीही सरकार तेच इंधन वापरण्याची सक्ती करत आहे. अमेरिकेकडून इथेनॉल खरेदी करण्यासाठी मोदी हे ट्रम्प यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे लोक म्हणत आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पदपथ करा अतिक्रमणमुक्त; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Badlapur : बारवी ९० टक्के भरले; ठाणेकरांना मोठा दिलासा, एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

Thane : जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट होणार, सरकारचा निर्णय

जंतरमंतरऐवजी पर्यायी जागेचा शोध

जव्हार : दाभोसा धबधब्यावर रेलिंग कोसळले; दोघे दरीत, वनकर्मचाऱ्यांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण, Video