पश्चिम बंगालमधील आसनसोल मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ; खुर्च्या-वाहनांची तोडफोड, VIDEO व्हायरल 
राष्ट्रीय

पश्चिम बंगालमधील आसनसोल मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ; खुर्च्या-वाहनांची तोडफोड, VIDEO व्हायरल

West Bengal Election Results 2026 : आसनसोल अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राबाहेर सोमवारी (दि.४) मतमोजणी सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर...

किशोरी घायवट-उबाळे

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आसनसोलमध्ये तणाव निर्माण झाला. आसनसोल अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राबाहेर सोमवारी (दि.४) मतमोजणी सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण पसरले होते.

प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी एका राजकीय पक्षाच्या तंबूवर हल्ला करत तेथील खुर्च्यांची तोडफोड केली. परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांचेदेखील नुकसान केले. एएनआय (ANI) ने शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये, एका पक्षाच्या तंबूमधील तुटलेल्या खुर्च्या आणि नुकसान झालेले साहित्य दिसून आले. या दृश्यांवरून घटनेची तीव्रता स्पष्ट होते.

पोलिसांचा लाठीचार्ज, अतिरिक्त बंदोबस्त तैनात

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आसनसोल-दुर्गापूर पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त प्रणव कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला. एका राजकीय पक्षाच्या कॅम्पवर हल्ला करून तोडफोड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींची ओळख पटवली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी सुरूच, भाजपची मोठी आघाडी

हिंसाचाराच्या घटनेदरम्यानही राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरूच होती. दुपारी १.३० वाजेपर्यंतच्या कलांनुसार, भाजप १८९ जागांवर आघाडीवर होती. तर तृणमूल काँग्रेस ९५ जागांवर आघाडीवर होती. इतर पक्ष ५ मतदारसंघांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र होते.

सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपने स्पष्ट आघाडी घेतल्याचे दिसत आहे. राज्यात भाजपकडे एकतर्फी विजयाची वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

मतमोजणीवर हिंसाचाराचे सावट

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीदरम्यान भाजप आघाडीवर असताना काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. आसनसोलमधील हिंसाचारामुळे मतमोजणी प्रक्रियेवर सावट आले असले, तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले आहे.

राज्यातील निकाल स्पष्ट होत असताना भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. मात्र, या दरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करा; आमदार रोहित पवारांची मागणी

Baramati By-Election : 'गुलाल नको, मिरवणुका नको'; विजय निश्चित होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कोल्हापुरात ‘शून्य सावली दिवस’ची अनोखी अनुभूती; ६ मे रोजी ५२ सेकंद सावली अदृश्य

विरार स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक! रेल्वे रुळांवर उतरून आंदोलन, नक्की काय घडलं? VIDEO

मुंबईतील झाडांची होणार शास्त्रीय नोंद; ८ वर्षांनंतर खासगी कंपनी करणार वृक्षगणना; झाडांची संख्या घटली की वाढली हे स्पष्ट होणार