(Photo-PTI)
राष्ट्रीय

आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांचा राजीनामा

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आसाममध्ये माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी सोमवारी राजीनामा दिल्याने राजकीय वादळ उठले.

Swapnil S

गुवाहाटी: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आसाममध्ये माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी सोमवारी राजीनामा दिल्याने राजकीय वादळ उठले.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी राजीनाम्याबाबत पुनर्विचार केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उघडपणे त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

एआयसीसीचे राज्य प्रभारी जितेंद्र सिंग यांनी दावा केला की, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी बोरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे. मात्र, बोरा यांनी सांगितले की, निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे वेळ मागितला आहे. “पक्ष नेतृत्वाने बोरा यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. राहुल गांधी यांनीही त्यांच्याशी १५ मिनिटे संवाद साधला,’ असे सिंग यांनी बोरा यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘हा आमचा अंतर्गत विषय आहे; त्यांना अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी राजीनामा मागे घेण्यास सहमती दर्शविल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असेही ते म्हणाले.

मात्र, निवासस्थानाबाहेर येताना बोरा म्हणाले, ‘माझे जुने सहकारी आणि पक्षाचे केंद्रीय नेतृत्व माझ्या घरी आले होते; मी त्यांचा सन्मान करतो. कुटुंबाशी—विशेषतः माझ्या भावांशी—बोलण्यासाठी उद्या सकाळपर्यंत वेळ मागितला आहे आणि त्यानंतर निर्णय घेईन. हा निर्णय आता केवळ माझा नाही; काँग्रेसमध्ये असल्यामुळे माझ्या भावांच्या व्यावसायिक हितसंबंधांवर परिणाम झाला आहे.

भाजपचे दरवाजे खुले

मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, भाजपाचे दरवाजे बोरा यांच्यासाठी खुले आहेत आणि त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास ‘सुरक्षित मतदारसंघातून’ निवडणूक जिंकण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसमधील ते शेवटचे हिंदू नेते आहेत ज्यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नाही. म्हणजेच आई-वडील मंत्री किंवा आमदार नव्हते,’ असे सरमा म्हणाले.

पॅराग्लायंडिंग वर्ल्ड कपचा थरार सुरू; पाचगणीच्या आकाशात देशी-विदेशी पॅराग्लायडर्सची भरारी

विजय मल्ल्याची नवीन चाल! भारतात कधी परतणार हे निश्चित सांगू शकत नाही; उच्च न्यायालयात नकारघंटा

Mumbai : लोकलमध्ये पोस्टरबाजी करणाऱ्या बंगाली बाबाला अटक; वडाळा येथे गुन्हा दाखल, १५ हजार पोस्टर्स जप्त,

अजित पवार विमान अपघात : ब्लॅकबॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी भारत घेणार अमेरिकेची मदत

Bhiwandi : महापालिका महापौर निवडणुकीला वेगळे वळण; भाजपने उमेदवार बदलला; नारायण चौधरी सेक्युलर आघाडीकडे