अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीने संघाला 'दु:ख' संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीने संघाला 'दु:ख'

अयोध्येतील श्री राम मंदिरातील देणगी पेटीतील अर्पणाच्या मोजणीत झालेल्या कथित गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी ‘दुःख’ व्यक्त केले. या प्रकरणाचा सुरू असलेला ‘एसआयटी’ तपास आणि पोलिसांची कारवाई एका ‘निर्णायक वळणावर’ पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

Swapnil S

बेळगावी : अयोध्येतील श्री राम मंदिरातील देणगी पेटीतील अर्पणाच्या मोजणीत झालेल्या कथित गैरव्यवहाराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी ‘दुःख’ व्यक्त केले. या प्रकरणाचा सुरू असलेला ‘एसआयटी’ तपास आणि पोलिसांची कारवाई एका ‘निर्णायक वळणावर’ पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

बेळगावी येथे आयोजित आरएसएसच्या वार्षिक ‘अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकी’च्या शेवटच्या दिवशी या मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत संघटनेने आपल्या प्रशिक्षण उपक्रमांचा, शताब्दी वर्ष कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि लोकसंख्येचे असंतुलन ते अंमली पदार्थांचे सेवन आदी मुद्द्यांवर चर्चा केली.

संघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की, ‘या बैठकीत सर्वांनी श्री रामजन्मभूमी मंदिरातील देणगी पेटीतील अर्पणाच्या मोजणीत झालेल्या गैरव्यवहाराच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून सुरू असलेली एसआयटी आणि पोलिसांची कारवाई एका निर्णायक वळणावर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. राम मंदिराप्रती भक्तांच्या आदर व विश्वासाला कोणतीही ठेच लागू नये म्हणून राम मंदिर ट्रस्ट न्यासाने पावले उचलावीत, असेही संघाला वाटते.

१० ते १२ जुलै दरम्यान झालेली या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे आणि २२६ कार्यकर्त्यांच्या उपस्थित होते. मार्च २०२६ नंतर आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात देशभरात ८३ ‘संघ शिक्षा वर्ग’ आणि १२ ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ आयोजित केला. ज्यात एकूण १८,८४२ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती देण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कळवा कारशेडजवळ प्रवाशांचा धोकादायक प्रवास; लोकल थांबताच धावत करतात लोकलमध्ये प्रवेश, मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

हाक मदतीची... धाव ठाणे पोलिसांची; ४० दिवसांत २२,५०७ मदतीचे कॉल, सरासरी ९ मिनिटांच्या आत प्रतिसाद

Mumbai : राणीबागेतील रिक्त बंगल्यासाठी उपमहापौर आग्रही; पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिले पत्र

‘ट्रॅश बूम’ रोखणार समुद्रात जाणारा कचरा; समुद्रात जाणाऱ्या सर्व नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा; अमित साटम यांचे महापौर, आयुक्तांना पत्र

आषाढी वारीसाठी ५,५०० विशेष बसेस सोडणार; ग्रुप बुकिंग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार