राष्ट्रीय

Manish Sisodia: सिसोदिया यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयांची कानउघाडणी

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जवळपास १७ महिने कारावासात असलेल्या सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांची कानउघाडणी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जवळपास १७ महिने कारावासात असलेल्या सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांची कानउघाडणी केली. कोणत्याही सुनावणीविना सिसोदिया यांना दीर्घकाळ तुरुंगवास भोगावयास लावणे हे जलद न्यायाच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यापूर्वी दीर्घकाळ तुरुंगवास भोगावयास लावणे याला सुनावणीविनाच शिक्षा म्हणून मान्यता देता येऊ शकत नाही, असे पीठाने स्पष्ट केले. सिसोदिया यांचे समाजातील स्थान तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे, असेही पीठाने नमूद केले.

सिसोदिया यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना १० लाख रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या दोन हमींसह दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला.

सिसोदिया यांना आपला पासपोर्ट विशेष कनिष्ठ न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून साक्षीदारांवर प्रभाव न टाकण्याच्या आणि पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न न करण्याच्या अटी त्यांच्यावर घालण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर सकाळी १० ते ११ या वेळेत हजेरी लावण्याचे आदेशही सिसोदिया यांना कारागृहातून सुटल्यानंतर सिसोदिया यांनी सांगितले की, घटना आणि लोकशाहीच्या सामर्थ्यामुळे आपल्याला जामीन मिळाला आहे आणि याच सामर्थ्याच्या जोरावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही कारागृहातून बाहेर येतील.

भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल, केजरीवाल

केवळ आपणच नव्हे तर दिल्लीतील प्रत्येक जण आणि देशातील मुले भावनिकदृष्ट्या आपल्यासमवेत कारागृहात होती. घटनेतील ताकदीचा वापर करून देशातील हुकूमशाही वृत्तीवर सणसणीत चपराक लगावल्याबद्दल आपण सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो. इतकेच नव्हे, तर आपण घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणी आहोत, असे ते म्हणाले आणि ‘भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल, केजरीवाल’, अशी घोषणाही त्यांनी दिली.

तिहारबाहेर जंगी स्वागत

जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली. सिसोदिया कारागृहाबाहेर येताच तेथे जमलेल्या ‘आप’चे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांच्यावर फुलांची उधळण केली.

जामीन हा नियम आहे, तर तुरुंग हा अपवाद

‘जामीन हा नियम आहे, तर तुरुंग हा अपवाद आहे, हे कनिष्ठ आणि उच्च न्यायालयांनी समजून घेण्याची वेळ आली आहे’, अशा तिखट शब्दांत न्या. बी. आर. गवई आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने न्यायालयांना खडसावले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी