केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला पोक्सोप्रकरणी अटक 
राष्ट्रीय

Telangana : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला पोक्सोप्रकरणी अटक

तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला बंडी भागीरथ याला पोलिसांनी अटक केली आहे.

Swapnil S

हैदराबाद : तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला बंडी भागीरथ याला पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी शनिवारी स्वतः त्यांच्या मुलाला पोलिसांसमोर हजर राहून चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. गेल्या आठवड्यात याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर लगेचच मुलाला पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, भागीरथने आपली कोणतीही चूक नसल्याचा दावा वारंवार केला असून त्याने आपल्या बाजूचे पुरावे वकिलांकडे सादर केले आहेत. हा गुन्हा रद्द होईल आणि भागीरथला जामीन मिळेल, असे वकिलांचे मत होते आणि याच कारणामुळे पोलिसांसमोर हजर होण्यास उशीर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण