प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

बंगळुरूत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतपत्रिकेवर होणार

ईव्हीएमवर शंका उपस्थित करून पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता बंगळुरूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

बंगळुरू : ईव्हीएमवर शंका उपस्थित करून पूर्वीप्रमाणेच मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता बंगळुरूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मेनंतर होणाऱ्या बंगळुरू येथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळुरू एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी.एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निवडणूक लागणार आहे.

यावर्षीच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाही बॅलेट पेपरने घेतल्या जातील. १० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्यानंतर २५ मेनंतर स्थानिक निवडणुका घोषित केल्या जातील. यावेळी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाईल, असे संगरेशी यांनी सांगितले.

कारण स्पष्ट नाही

निवडणूक आयोगाने ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे कारण स्पष्ट केले नाही. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात कायद्यात कुठेही अडचण नाही त्यामुळे या निवडणुकीत बॅलेटचा वापर केला जाईल इतकेच निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. बॅलेटच्या वापरावर बंदी नाही, राज्य निवडणूक आयोगाने सर्वांशी सल्लामसलत करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या घोषणेनंतर भाजपने, ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याबाबत कडाडून विरोध केला. राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरू झाली. काँग्रेस पक्ष केवळ राहुल गांधींना खूश करण्यासाठी मतपत्रिकेवर निवडणूक घेत आहे. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव स्पष्ट आहे मग ईव्हीएम असो वा बॅलेट पेपर, असा टोला भाजप प्रवक्ते प्रकाश एस. यांनी लगावला.

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात उद्या अंतिम सुनावणी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ'बाबतही फैसला

उल्हासनगरमध्ये शिवसेनेचाच महापौर; वंचितचा निर्णायक पाठिंबा, भाजप विरोधी बाकांवर बसणार

शरद पवारांची राष्ट्रवादी BMC तून आऊट; एक नगरसेवक असल्याने पक्ष कार्यालयाला मुकावे लागणार

अंबरनाथ नगरपरिषद सत्तावाद : शिवसेना-NCP की BJP-काँग्रेस? खरी आघाडी कोणाची? जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसांत निर्णय घ्यावा - HC

Mumbai : महापौर महायुतीचाच; देवेंद्र फडणवीस यांची दावोसमधून एकनाथ शिंदेंशी फोनवरून चर्चा