हरदीप पुरी, स्मृती इराणी यांचे पत्ते कट; उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी भाजपचे आठ उमेदवार जाहीर 
राष्ट्रीय

हरदीप पुरी, स्मृती इराणी यांचे पत्ते कट; उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी भाजपचे आठ उमेदवार जाहीर

उत्तर प्रदेशातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीतून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बनवारी लाल वर्मा या दोन वजनदार मंत्र्यांसह माजी शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांचे पत्ते कट करण्यात आले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीतून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री बनवारी लाल वर्मा या दोन वजनदार मंत्र्यांसह माजी शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांचे पत्ते कट करण्यात आले आहेत.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीत मंत्री धर्मपाल सिंह यांच्यासह राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यसागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, प्रियांका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रुती गंगवार यांचा समावेश आहे. स्मृती इराणी, वरुण गांधी, संजीव बाल्यान यांच्यासह कवी कुमार विश्वास यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. पण भाजपने या चौघांनाही धक्का देत उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता उमेदवार घोषित केले.

उमेदवारांची निवड करताना सामाजिक, प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. या यादीत तीन उमेदवार उच्चवर्णीय समाजातील आहेत. त्यापैकी राधाकांत ओझा आणि गोपी कृष्ण पांडे हे ब्राह्मण आहेत. दोन महिला उमेदवार असून तीन उमेदवार इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दोन उमेदवार अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील आहेत.

उत्तर प्रदेशातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांमध्ये भाजपचे हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, गीता शाक्य, नीरज शेखर, बृजलाल, बी. एल. वर्मा आणि सीमा द्विवेदी यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव आणि बहुजन समाज पक्षाचे रामजी गौतम यांचाही कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपत आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एकूण १२ जागांसाठी १६ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील १० जागा, उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश असून पश्चिम बंगालमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विद्यमान राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यावर पाणीसंकट! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात; जलसंपदा विभागाचा निर्णय

आदिवाणी : शोषित, वंचितांसाठी तंत्रज्ञान

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Healthy Pizza Recipe : मुलांच्या आवडीचा पिझ्झा आता हेल्दी पद्धतीने; मोड आलेल्या मुगाची रेसिपी नक्की ट्राय करा