अखिलेश यादव ट्वीट X akhilesh yadav
राष्ट्रीय

Video : युवकानं तब्बल आठवेळा केलं भाजपला मतदान, इंडिया आघाडीच्या 'या' नेत्यानं शेअर केला व्हिडिओ

Suraj Sakunde

लखनऊ: सध्या देशभरात लोकसभा निवडणूका सुरु आहेत. २० मे रोजी देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान इंडिया आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजावादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक युवक एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल आठ वेळा ईव्हीएमचं बटन दाबून भाजपला मतदान करताना दिसत आहे. एवढंच नाही, हे करत असतानाचा व्हिडीओ त्या युवकानं स्वतःच बनवल्याचं दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्वीटर) शेअर करत अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगासमोर प्रश्न उपस्थित केले.

निवडणूक आयोगाला जर हे चुकीचं वाटत असेल तर...

अखिलेश यादव यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "निवडणूक आयोगाला जर हे चुकीचे झालंय असं वाटत असेल, तर नक्की कारवाई करा, नाहीतर...भाजपाची बूथ कमिटी, खरंतर लूट कमिटी आहे..."

या पोस्टखाली त्यांनी 'नहीं_चाहिए_भाजपा' असा हॅशटॅगही लिहिला आहे.

आठही मतं भाजप उमेदवाराला...

अखिलेश यादव यांनी १७ सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर पूर्ण व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूर्ण व्हिडीओ २ मिनिटे १९ सेकंदांचा आहे. या व्हिडिओत एक युवक तब्बल आठ वेळा मतदान करत असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर हा युवक प्रत्येक वेळी मत दिल्यानंतर ते मोजत आहे. संबंधित युवक केवळ बूथमध्ये मतदान करतानाच नाही, तर ते मत कुणाच्या नावे केलं याबद्दल तो व्हिडिओमध्ये सांगत आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त