निवडणूक चिन्हाच्या फेरवाटपावरून कोलकाता उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगावर ताशेरे 
राष्ट्रीय

निवडणूक चिन्हाच्या फेरवाटपावरून कोलकाता उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगावर ताशेरे

नंदिग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत 'आयएसएफ'कडून 'पाकिट' हे चिन्ह नव्याने स्थापन झालेल्या 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस'ला देण्याच्या निर्णयावरून कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले.

Swapnil S

कोलकाता : नंदिग्राम विधानसभा पोटनिवडणुकीत 'आयएसएफ'कडून 'पाकिट' हे चिन्ह नव्याने स्थापन झालेल्या 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस'ला देण्याच्या निर्णयावरून कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले. "निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे," अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

निवडणूक आयोगाकडे १८३ मुक्त (स्वतंत्र) चिन्हे उपलब्ध असताना, पश्चिम बंगालमधील नंदिग्राम पोटनिवडणुकीत हेच 'पाकिट' चिन्ह नवीन पक्षाला देण्याचे काय कारण होते, असा सवाल न्यायालयाने केला. या मतदारसंघात आयएसएफनेही आपला उमेदवार उभा केला आहे. न्यायालयाने टिप्पणी करताना स्पष्ट केले की, ते चिन्ह आरक्षित ठेवायला हवे होते. "संबंधित प्राधिकरणाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे," असे न्यायमूर्ती कृष्णा राव यांनी नमूद केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, दुष्काळाबाबत मदतीचा आदेश आज निघणार

मुंबई, पुण्यातील निवासी अतिक्रमणे होणार अधिकृत

मीरा-भाईंदरमध्ये बांधकामाच्या परवानग्या कशा? 'सेव्हन इलेव्हन' प्रकरणाची चौकशी