केंद्राची मोठी कारवाई; यूएपीए अंतर्गत पाकिस्तानातील २३ जण दहशतवादी घोषित 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

केंद्राची मोठी कारवाई; यूएपीए अंतर्गत पाकिस्तानातील २३ जण दहशतवादी घोषित

यापूर्वी यूएपीए अंतर्गत केवळ संघटनांनाच दहशतवादी घोषित करण्याची तरतूद होती. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित २३ जणांना अधिकृतपणे 'दहशतवादी' घोषित केले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

यूएपीएनुसार, एखादी व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा विश्वास केंद्र सरकारला वाटल्यास, त्या व्यक्तीला 'दहशतवादी' म्हणून घोषित करण्याचा अधिकार सरकारला आहे. अशा घोषणेनंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इतर तपास यंत्रणांना संबंधित व्यक्तींची मालमत्ता गोठवणे, निधीपुरवठ्याचे मार्ग बंद करणे, शस्त्रांवरील प्रवेश मर्यादित करणे तसेच त्यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करता येते.

यापूर्वी यूएपीए अंतर्गत केवळ संघटनांनाच दहशतवादी घोषित करण्याची तरतूद होती. मात्र, २०१९ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर व्यक्तींनाही दहशतवादी घोषित करण्याची तरतूद करण्यात आली.

या नव्या घोषणेनंतर देशातील अधिकृतपणे नामनिर्देशित वैयक्तिक दहशतवाद्यांची संख्या ८० वर पोहोचली आहे. या यादीत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्ये कथित सहभाग असलेल्या अनेक दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित म्हणून मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसद्दिक उर्फ डॉक्टर, मुफ्ती मोहम्मद असगर खान उर्फ अबू साद, हाफिज अब्दुल शकूर उर्फ कारी जर्रार, अब्दुल्ला जेहादी, गुलाम फरीद, मौलाना इमदाद उल्लाह मक्की आणि वसीम नूर जाट यांचा समावेश करण्यात आला आहे.

लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी

लष्कर-ए-तैयबाशी संबंधित म्हणून फिरदौस अहमद भट, हारून रशीद गनाई, बिलाल अहमद मीर, अबिद कयूम लोन, नझीर अहमद गुज्जर, अब्दुल रऊफ उर्फ हाफिज अब्दुल रऊफ, अशफाक अहमद, हाफिज खालिद वलीद, मौलाना सैफुल्ला खालिद, मोहम्मद याकूब, मौलाना युसूफ तैबी, ओवैस फारूज, कारी याकूब शेख, राणा इफ्तिखार आणि मोहम्मद शहीद फैसल यांचा समावेश आहे.

अधिकृत माहितीनुसार, मोहम्मद शहीद फैसल याचे अल-कायदा आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनांशीही संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके