‘या आहेत फक्त पोटनिवडणुका’ - सरन्यायाधीश सूर्य कांत  (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

‘या आहेत फक्त पोटनिवडणुका’ - सरन्यायाधीश सूर्य कांत

पश्चिम बंगालमधील आगामी रेजीनगर आणि नंदीग्राम पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तेथील 'एसआयआर' प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास आज स्पष्ट नकार दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील आगामी रेजीनगर आणि नंदीग्राम पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तेथील 'एसआयआर' प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास आज स्पष्ट नकार दिला. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या विषयावर तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती.

वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी आधी २९ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली होती, परंतु कॉज लिस्टमध्ये (कार्याची सूची) त्याचा समावेश झालेला नाही. सध्या या प्रकरणाची पुढील तारीख ५ ऑक्टोबर दाखवली जात आहे, तर रेजीनगर आणि नंदीग्राममधील पोटनिवडणुकांसाठी ६ ऑक्टोबरपासून मतदान सुरू होत आहे.

मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याविरोधात हजारो अपिले प्रलंबित असल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले. तसेच यातील अनेक नागरिकांना मागील निवडणुकांमध्येही मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता, असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, सरन्यायाधीशांनी हा युक्तिवाद फेटाळत "या फक्त पोटनिवडणुका आहेत," अशी टिप्पणी केली आणि न्यायालय ५ ऑक्टोबर रोजीच या विषयावर सुनावणी घेईल, असे स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचा तिजोरीवर भार! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारची कर्ज उभारण्याची तयारी

...तर वाहतूक दंड वीज बिलात समाविष्ट; सुप्रीम कोर्टाची सूचना

काँग्रेसची देशभर निदर्शने; आग्र्यात ज्ञानेश कुमारांच्या घराला फासले काळे

BEST चे धाबे दणाणले; धारावीत वीजपुरवठ्यासाठी बड्या कंपनीचा अर्ज

Pune : १४०० कोटींचा चाकण आराखडा; मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता