ANI
राष्ट्रीय

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना दारूच्या नशेत विमानातून उतरवले ?

भगवंत मान यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी कट रचण्यात आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे

वृत्तसंस्था

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचे विमान चुकले आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला; मात्र जर्मनी दौऱ्यावर असणाऱ्या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याने विमान प्रवास लांबल्याचे वृत्त आहे. या प्रकरणावर आम आदमी पक्षानेही स्पष्टीकरण दिले असून तब्येत ठीक नसल्याने भगवंत मान यांना परत येण्यास उशीर झाला, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. भगवंत मान यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी कट रचण्यात आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.

भगवंत मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. “जास्त नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही ते गैरहजर राहिले. या घटनेने जगभरातील पंजाबींना लाज वाटत आहे,” असे ट्विट अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केले आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, “पंजाब सरकार मात्र या मुद्द्यावर शांत बसले आहे. अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले पाहिजे. पंजाबी आणि देशाच्या अभिमानाचा मुद्दा असल्याने केंद्र सरकारने याची दखल घेतली पाहिजे. जर त्यांना विमानातून उतरवले असेल, तर सरकारने जर्मनीच्या प्रतिनिधींकडे हा मुद्दा उपस्थित करायला हवा.”

भगवंत मान आपल्या दोन पायांवर उभे राहू शकत नव्हते. त्यांच्या पत्नी आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना आधार दिला होता, अशी माहिती सहप्रवाशाने दिल्याची टीका काँग्रेसने केली आहे; मात्र ‘आप’ने स्पष्टीकरण देताना म्हटले की, “नियोजित वेळापत्रकानुसार ठरल्याप्रमाणे १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री परत आले. सोशल मीडियावरील सर्व रिपोर्ट प्रोपगंडा आहे. विदेशातून गुंतवणूक आणत असल्याने विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत. तुम्ही विमान कंपनीकडेही तपशील मागू शकता.”

आनंदवार्ता! केरळमध्ये मान्सून दाखल; मुंबईत कधी बरसणार?

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला वेग; जुळ्या बोगद्यांसाठी TBM यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

'सॉरी आई बाबा... मी सगळं उद्ध्वस्त केलं’; NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाइड नोटमुळे हळहळ

Mumbai : एअर इंडियाची इमारत १५ ऑगस्टपासून सेवेत रुजू

पुणे विषारी दारू प्रकरणात नवी मुंबईतील बाप-लेक अटकेत; घातक रसायने पुरविल्याचे उघड, आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई