बारावीची ९, दहावीची १५ फेब्रुवारीपासून परीक्षा; CISCE बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

बारावीची ९, दहावीची १५ फेब्रुवारीपासून परीक्षा; CISCE बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) मंडळाने मंगळवारी २०२७ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, तर बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) मंडळाने मंगळवारी २०२७ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, तर बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

या दोन्ही परीक्षांना एकूण ३ लाख ७९ हजार ९८० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. आयसीएसई (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी संलग्न ३,१०६ शाळांमधील सुमारे २.७० लाख विद्यार्थी, तर आयएससी (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी १,६५१ शाळांमधील १ लाख १० हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आयसीएसई परीक्षेत एकूण ७६ विषयांचे पेपर असतील, तर आयएससी परीक्षेत ६० विषयांचा समावेश असेल.

सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव जोसेफ इमॅन्युएल यांनी सांगितले की, २०२७ ची आयसीएसई परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२७ रोजी संपेल. भारतासह परदेशातील एकूण २,८३५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

आयसीएसई परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी उत्तर प्रदेशातून ५१,१६८, पश्चिम बंगालमधून ४६,५२१, कर्नाटकातून ३३,४१७, महाराष्ट्रातून ३१,०३५, पंजाबमधून १९,३०८ आणि झारखंडमधून १७,२०१ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

२०२७ ची आयएससी अर्थात बारावीची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ८ एप्रिल रोजी संपणार आहे. या परीक्षेसाठी भारतासह परदेशातील १,४७७ परीक्षा केंद्रांवर संलग्न १,६५१ शाळांमधील एकूण १ लाख १० हजार २५ विद्यार्थी प्रविष्ट होतील.

दरम्यान, २०२७ च्या आयसीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. परीक्षेचा वाचन कालावधी सकाळी १० वाजता सुरू होईल, तर प्रत्यक्ष लेखनाला सकाळी १०.१५ वाजता सुरुवात होईल. यापूर्वी वाचनासाठी सकाळी १०.४५ आणि लेखनासाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित होती.

उत्तर प्रदेशातून सर्वाधिक विद्यार्थी

राज्यनिहाय आकडेवारीनुसार, बारावीच्या परीक्षेसाठी उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ३४,७०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमधून ३०,२३५, उत्तराखंडमधून ५,६२९, पंजाबमधून ५,४७९, झारखंडमधून ५,३५६, महाराष्ट्रातून ४,६६०, तमिळनाडूतून ३,५७२, केरळमधून ३,४९१ आणि कर्नाटकातून ३,०१० विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गोकुळवर महायुतीचा झेंडा! शासननियुक्त ४ मते ठरली निर्णायक; अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड, सतेज पाटील यांना धक्का

Mumbai : मालवणीत १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू; फटाक्यांच्या दुकानात आग अन् छत कोसळले

Bhaubeej 2026 Marathi Wishes : 'आली आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी!' भाऊबीजेनिमित्त खास शुभेच्छा अन् कार्ड्स

आजचे राशिभविष्य, ११ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Health Tips : रोज पुरेशी झोप घेत नाही? शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम; तज्ज्ञ सांगतात...