राष्ट्रीय

'सीजेपी'ला दिल्लीत हॉल मिळेना; भाजपचा दबाव, दीपकेंचा आरोप, बैठक रद्द करण्याची वेळ

दिल्लीतील नारायणा येथे आयोजित करण्यात आलेली 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी अचानक रद्द करण्यात आली. सत्ताधारी भाजपकडून आलेल्या दबावामुळेच बँक्वेट हॉलच्या मालकाने ऐनवेळी बुकिंग रद्द केल्याचा खळबळजनक आरोप 'सीजेपी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील नारायणा येथे आयोजित करण्यात आलेली 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी अचानक रद्द करण्यात आली. सत्ताधारी भाजपकडून आलेल्या दबावामुळेच बँक्वेट हॉलच्या मालकाने ऐनवेळी बुकिंग रद्द केल्याचा खळबळजनक आरोप 'सीजेपी'चे संस्थापक अभिजित दीपके यांनी केला आहे.

दिल्लीत कार्यकर्त्यांचे संमेलन घेण्यास आपल्याला रोखले जात असल्याचे सांगत दीपके म्हणाले, आम्हाला कुठेही सभा घेऊ दिली जात नाही. आसपासच्या इतर बँक्वेट हॉल चालकांनीही भीतीपोटी जागा देण्यास नकार दिला आहे. सीजेपीला बैठकांसाठी जागा देऊ नये म्हणून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असून त्यांना धमकावले जात आहे. तुम्ही जितक्या धमक्या द्याल, तितके आम्ही अधिक मजबूत होऊ. आम्ही अशा दबावाला अजिबात घाबरणार नाही, असे दीपके म्हणाले.

आंदोलनानंतर पक्षाचा विस्तार करण्यासाठी सीजेपीने नुकतीच आपल्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा केली होती, ज्यामध्ये अभिजित दीपके यांची पक्षाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी सुरू असतानाच दिल्लीतील बैठकीला मिळालेल्या या नकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजीत दिपके यानं जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था समोर आणणार असल्याचे जाहीर केले. देशाला स्वतंत्र होऊन ८० वर्ष झाले, मात्र शैक्षणिक दुरवस्था आहे. मंत्री, खासदार, आमदार यांचे निवासस्थान, कार्यालय नव्याने बांधले, मात्र शाळा का नाही बांधल्या, असा प्रश्न उपस्थितीत करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्यावर दिपके यांनी समाज माध्यमांवर माहिती जाहीर केली. या स्वातंत्र्यदिनी, गावांमधील सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सीजेपी “स्कूल ठीक करो” अभियानाची सुरुवात करणार आहे.

उलटे टांगण्याची धमकी

बैठक रद्द झाल्यानंतर दीपके म्हणाले की, आयोजकांनी ठरलेल्या वेळेत सभागृह आरक्षित केले होते. मात्र, कार्यकर्ते आणि आयोजक जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आम्ही हॉल देऊ शकत नाही, असे सांगत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. जर येथे सीजेपीची बैठक होऊ दिली तर उलटे टांगू, अशी धमकी हॉलमालकांना देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'डॉमिनोज'च्या ४ दुकानांचे परवाने निलंबित; मुंबईतील तीन तर कराडमधील एका शाखेचा समावेश

सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार; अमित शहांचे विरोधकांना आव्हान, सलग एक दिवस चर्चा करा

फुटलेल्या फुग्यात हवा भरण्याचा प्रयत्न; राहुल गांधी यांची टीका

घाटकोपरमध्ये मृत्यूची दरड! ७ ठार, ७ जखमी; चिराग नगर येथील चाळींवर कोसळले महाकाय दगड; पहाटे ३.४८ वाजता काळाचा घाला

Mumbai : विलेपार्लेत अग्नितांडव! मुलासह महिलेचा मृत्यू; सहाजण जखमी