मुंबई: देशभरातील तेल कंपन्यांनी १ जुलै २०२६ पासून सर्वसामान्यांना आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. बुधवारपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे १८३ रुपयांची, तर ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे १३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. यासोबतच, देशांतर्गत विमान सेवांसाठी लागणाऱ्या 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'च्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची कपात करून ते ११० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशिवाय, देशात ७ हजारांहून अधिक पेट्रोल पंप चालवणाऱ्या खाजगी तेल कंपनी 'नयारा एनर्जी'ने देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे.
१८३ रुपयांनी कमी, पुरवठाही सुरळीत
कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी कपात केली आहे. २६ मार्च रोजी संकटकाळात वाढवलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत.
कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी कपात केली आहे. २६ मार्च रोजी संकटकाळात वाढवलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत.
७ मार्चपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत चार टप्प्यांत वाढ झाली होती आणि हा दर १,३४५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता पुरवठा परिस्थिती सुधारल्यामुळे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने २५ जून रोजी औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्ववत केला आहे. पुरवठ्यातील सुधारणेमुळेच ही दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात सरकारने 'एटीएफ' (ATF) किंमत स्थिरीकरण योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत सहभागी विमान कंपन्या तीन वर्षांपर्यंत ११५ रुपये प्रति लिटर या निश्चित दराने इंधन खरेदी करू शकतात. जर एटीएफची जागतिक किंमत ८६.३२ रुपये प्रति लिटरच्या बेस रेटपेक्षा वाढली, तर सरकार तेल कंपन्यांना बिनव्याजी आगाऊ रक्कम देऊन ही तफावत भरून काढणार आहे. उलटपक्षी, दर कमी झाल्यास अतिरिक्त रक्कम सरकारकडे जमा केली जाईल.
नायरा एनर्जीचा ग्राहकांना दिलासा: दुसरीकडे, नायरा एनर्जीने आपल्या ७,००० पेक्षा जास्त इंधन केंद्रांवर पेट्रोलच्या किमतीत ५ रुपये आणि डिझेलच्या किमतीत ३ रुपये प्रति लिटरची कपात केली आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळल्याने आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर झाल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत, ज्याचा फायदा ग्राहकांना मिळत आहे.
विशेष म्हणजे, दोन वर्षांतील ही पहिलीच अशी घटना आहे, जिथे एखाद्या इंधन विक्रेत्याने किरकोळ विक्रीच्या किमती कमी केल्या आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात नायरा एनर्जीने इंधनाचे दर वाढवले होते.
दरम्यान, देशातील ९० टक्क्यांहून अधिक बाजारपेठ काबीज करणाऱ्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांनी मात्र पेट्रोल व डिझेलचे दर जैसे-थेच ठेवले आहेत. दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल १०२.१२ रुपये आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
एलपीजी सिलेंडरचे नवे दर (प्रमुख शहरे):
दिल्ली: १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८३.५ रुपयांची कपात झाली असून, आता तो २,९३० रुपये झाला आहे.
मुंबई: १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८२ रुपयांची कपात झाली असून, आता तो २,८८५ रुपये झाला आहे.
५ किलो फ्री ट्रेड एलपीजी: ५ किलोच्या छोट्या सिलेंडरच्या रिफिलचा दर आता ८०८.५ रुपये झाला आहे.