राष्ट्रीय

अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचे गंभीर आरोप; म्हणाले "अजित डोवाल यांनी..."

लोकसभेमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत गंभीर आरोप केले.

प्रतिनिधी

आज लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. आधी पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या अग्नीवर योजनेवरही टीका केली. ते म्हणाले की, "भारत जोडो यंत्रामध्ये अनेक युवकांनी अग्निवीर योजनेची तक्रार केली. तसेच, ही योजना भारतीय सैन्यालादेखील मान्य नाही." असा खळबळजनक दावा त्यांनी केला. तसेच, सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी मला सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित डोवाल यांनी ही योजना सैन्यावर लादली आहे, असा गंभीर आरोप केला.

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, “अग्निवीर योजनेबाबत युवक मला सांगत होते की, आम्ही सकाळी ४ वाजता धावायला जातो. खूप तयारी करतो. याआधी आम्हाला सैन्यात १५ वर्षांची सर्विस मिळत होती. आता चारच वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे. त्यानंतर काढून टाकले जाईल, पेन्शनही मिळणार नाही, अशी तक्रार केली. तसेच, काही सैन्यातील माजी अधिकारी या योजनेवर नाखूश आहेत. ही योजना सैन्याकडून आलेली नसून राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि केंद्रीय गृहखात्याच्या डोक्यातून आलेली आहे, असे माजी अधिकाऱ्यांनी मला सांगितले. ही योजना सैन्यावर लादलेली असून अग्निवीर योजना ही भारतीय सैन्याला कमकुवत करू शकते. हजारो लोकांना आपण शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना ४ वर्षांनी समाजात सोडणार आहोत. बेरोजगारीमुळे समाजामध्ये हिंसा वाढू शकते.”

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज

Mumbai : रेल्वे स्थानकांबाहेर फेरीवाल्यांचा धोका रोगासारखा फैलावतोय; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता