रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्याची परवानगी दिली असून, त्यासाठी 'ना-हरकत प्रमाणपत्र' जारी केले आहे, अशी माहिती शनिवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्याची परवानगी दिली असून, त्यासाठी 'ना-हरकत प्रमाणपत्र' जारी केले आहे, अशी माहिती शनिवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलीस उपायुक्त (मध्य) रोहित राजबीर सिंग म्हणाले, काँग्रेसने १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर रॅलीचे नियोजन केले असून, त्यासाठी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे 'ना-हरकत प्रमाणपत्रा'ची मागणी केली होती. निर्धारित निदर्शन स्थळावर रॅली आयोजित करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीसाठी हे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे.

पोलीस प्रशासनाने सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि प्रस्तावित रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी दिल्ली पोलीस आयोजक, वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांशी सतत समन्वय साधत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

अभिजीत दीपकेंना सशर्त जामीन; शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क; सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

भारताला तेल दिलासा; प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

Thane : पुलाचा लोखंडी सांगाडा कारवर कोसळला; कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड

मंदिराच्या जमिनीचा स्वीकार भेट म्हणून नाही - सर्वोच्च न्यायालय