राष्ट्रीय

Himachal Pradesh Election : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस ठरणार वरचढ ? लवकरच आकडा होणार स्पष्ट

विधानसभेच्या 68 जागांसाठी 412 उमेदवार रिंगणात आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 75.6 टक्के मतदान झाले

प्रतिनिधी

गुजरात बरोबरच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या 68 जागांसाठी 412 उमेदवार रिंगणात आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 75.6 टक्के मतदान झाले होते. या राज्यात दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होते. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (8 डिसेंबर) मतमोजणी सुरू असून येथे कोणाची सत्ता येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी येथे जाहीर सभा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही येथे भाजपसाठी मते मागितली. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही या राज्यात जोरदार प्रचार केला. एक्झिट पोलनुसार भाजपला 24 ते 34 तर काँग्रेसला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ २१ जागा जिंकता आल्या.

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम