उमर खालिदचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला  (Photo - ANI)
राष्ट्रीय

उमर खालिदचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ईशान्य दिल्लीतील २०२० मधील दंगलीच्या कटातील आरोपी आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याचा १५ दिवसांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने मंगळवारी खालिदला धक्का दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील २०२० मधील दंगलीच्या कटातील आरोपी आणि जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याचा १५ दिवसांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने मंगळवारी खालिदला धक्का दिला. जामिनासाठी दिलेली कारणे अवाजवी आणि अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. उमर खालिदने आपल्या काकांच्या निधनानंतरचे ४० व्या दिवसाचे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी आणि शस्त्रक्रिया होणार असलेल्या आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी १५ दिवसांच्या अंतरिम जामिनाची मागणी केली होती.

उमर खालिदचा अर्ज फेटाळताना न्यायाधीश म्हणाले की, काकांच्या अंत्यविधीनंतरच्या विधींना उपस्थित राहणे इतके आवश्यक वाटत नाही. जर हा विधी एखाद्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाचा असता, तर परिस्थिती वेगळी असती. जर हे नाते इतके घट्ट आणि जवळचे असते, तर अर्जदाराने काकांच्या निधनाच्या वेळीच जामिनासाठी अर्ज करावयास हवा होता. इतक्या प्रदीर्घ काळानंतर जामिनासाठी दिलेले हे कारण योग्य वाटत नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी

Mumbai : धक्कादायक! SNDT कॉलेजच्या कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

Thane : 'स्वस्त घर' आणि शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने २.९७ कोटींची फसवणूक; तिघांविरोधात तक्रार

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण