Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत

मुसळधार पावसात चुकीच्या ठिकाणी उतरल्याने ती अडकली होती. मदतीच्या बहाण्याने चालक आणि कंडक्टरने तिला बसमध्ये घेतले आणि सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान...

Mayuri Gawade

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या २०१२ च्या ‘निर्भया’ प्रकरणाची आठवण ताजी करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुसळधार पावसात चुकीच्या ठिकाणी उतरल्याने ती अडकली होती. मदतीच्या बहाण्याने चालक आणि कंडक्टरने तिला बसमध्ये घेतले आणि सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मैनपुरी जिल्ह्यातील ही मुलगी इयत्ता अकरावीत शिकते. ४ ऑगस्टच्या रात्री कुटुंबीयांशी वाद झाल्यानंतर ती नोएडात राहणाऱ्या चुलत भावाला भेटण्यासाठी घरातून निघाली. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौक येथे उतरली. पुढे जाण्यासाठी वाहन शोधत असताना तिने एका रिकाम्या स्लीपर बसला हात दाखवला. चालक आणि कंडक्टरने बस नोएडा सेक्टर ६३च्या दिशेने जात असल्याचे सांगून तिला आत घेतले.

४७ किलोमीटरच्या प्रवासात अत्याचाराचा आरोप

बस सुरू झाल्यानंतर कंडक्टरने मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरूवार केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. बसने परी चौक ते काश्मीर गेट असा जवळपास ४७ किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर तिला काश्मीर गेट बस टर्मिनलजवळील रिंग रोडवर सोडून आरोपी पसार झाले.

दोन्ही आरोपी अटकेत

पीडित मुलीने काश्मीर गेट पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तिमारपूरमधील बस पार्किंग परिसरातून कुलदीप आणि संदीपला अटक केली. संबंधित बसही ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

तपासात ही बस यापूर्वी बंद पडल्याने सुरजपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेण्यात आली होती. दुरुस्तीनंतर चालक आणि कंडक्टर रिकामी बस तिमारपूरकडे घेऊन जात असताना त्यांना परी चौक येथे ही मुलगी भेटली. बसमधील स्लीपर बर्थभोवती पडदे असल्यामुळे आत नेमके काय सुरू होते, हे बाहेरून सहज दिसत नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले.

काय होतं 'निर्भया' प्रकरण?

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील धावत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभर संताप उसळला आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित कायदे अधिक कडक करण्यात आले. माध्यमांनी पीडितेला ‘निर्भया’ हे नाव दिले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान; राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

Mumbai : डीआरआयची आंतरराष्ट्रीय सोने तस्करांच्या टोळीवर मोठी कारवाई; १०.७५ कोटींचे सोने जप्त, सहा जणांना अटक

गेटवे-मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AIPA ची सुरक्षित जलवाहतुकीची मागणी

समृद्धी महामार्गालगत CNG पाइपलाईनला गळती; धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार

भारतीय मानक वेळ अनिवार्य करणारे नियम सरकारकडून जारी; अंमलबजावणीसाठी १८० दिवसांची मुदत