राष्ट्रीय

Delhi CNG Blast : सीएनजी भरतानाच ट्रकच्या टँकचा भीषण स्फोट; ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, परिसर हादरला

दिल्लीतील टिकरी कलां येथील सीएनजी स्टेशनवर एक ट्रक गॅस भरण्यासाठी आला होता. पंपावरील कर्मचारी ट्रकमध्ये गॅस भरत असतानाच त्याच्या टँकचा जोरदार स्फोट झाला.

Mayuri Gawade

दिल्लीतील टिकरी कलां परिसरातील सीएनजी पंपावर बुधवारी (दि. १९) ट्रकमध्ये गॅस भरत असताना गॅस टँकचा अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सीएनजी पंपावरील ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ट्रक चालकासह इतर काही जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी एक कर्मचारी स्फोटाच्या वेळी ट्रकमध्ये गॅस भरत होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गॅस भरत असतानाच स्फोट

प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील टिकरी कलां येथील सीएनजी स्टेशनवर एक ट्रक गॅस भरण्यासाठी आला होता. पंपावरील कर्मचारी ट्रकमध्ये गॅस भरत असतानाच त्याच्या टँकचा जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेत पंपावरील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक आणि जवळ उभ्या असलेल्या इतर काही जणांनाही दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.

अग्निशमन दलाला ३.३७ वाजता माहिती

दिल्ली अग्निशमन दलाला दुपारी ३.३७ वाजता स्फोटाची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोटानंतर कोणताही अतिरिक्त धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

ट्रकच्या गॅस टँकचा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गॅस भरताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती का किंवा अन्य कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी केली जात असून, तपासानंतरच स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वसई-विरारपर्यंत मेट्रो धावणार; मीरा-भाईंदर ते विरार मेट्रोला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मान्यता

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO