सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका; आज होणार सुनावणी X
राष्ट्रीय

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका; आज होणार सुनावणी

दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या १८ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या १८ दिवसांपासून उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, 'सीजेपी'ने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिननुसार, वांगचुक सध्या "खूप अशक्त" आहेत आणि ते २४ तास वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. त्यांचे वजन ५७.१५ किलोवर आले असून, उपोषण सुरू झाल्यापासून त्यांचे एकूण ८.९ किलो वजन कमी झाले आहे. डॉक्टर म्हणाले की, ते शुद्धीत आणि मानसिकदृष्ट्या सतर्क आहेत, परंतु त्यांना सतत देखरेखीची गरज आहे.

न्यायालयातील याचिकेत वांगचुक यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा आणि उपचार देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या खंडपीठाने केंद्र आणि दिल्ली सरकारकडून गुरुवार सकाळपर्यंत उत्तर मागितले आहे. बार असोसिएशनच्या बहिष्कारांमुळे सरकारकडून कोणताही वकील उपस्थित नसल्याने याबाबतची बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही.

सरकारने सोनम वांगचुक यांना तातडीने आपत्कालीन उपचार, जीवनरक्षक उपचार आणि आवश्यक पोषण उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर सरकारने त्यांच्या आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू करावी. एखाद्याचा जीव धोक्यात असताना सरकार गप्प बसू शकत नाही. उपोषणाचा अधिकार शांततापूर्ण विरोधाचा भाग आहे, परंतु नागरिकाचा जीव वाचवणे ही देखील सरकारची जबाबदारी आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

सिनेकलावंतांचे साकडे

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि सोनी राजदान यांनी सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. देशाच्या न्यायाच्या लढ्यासाठी त्यांची प्रकृती उत्तम असणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत असलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनात सहभागी होऊन वांगचुक उपोषण करीत आहेत. देशाला तुमची गरज आहे असे या कलाकारांनी म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज

बुलेट ट्रेनचा तात्पुरता पूल गेला वाहून; काम रखडणार

जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; महायुतीत जाण्याची शक्यता फेटाळली

एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहांची भेट

भाजपला पाठिंब्याचे वृत निराधार- सुप्रिया सुळे