दिल्लीच्या मंत्र्याने तरुणाला थप्पड लगावली; Video (Photo-X)
राष्ट्रीय

दिल्लीच्या मंत्र्याने तरुणाला थप्पड लगावली; Video

तिलक रस्त्याची पाहणी करतानाचे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी कथितपणे कानशिलात मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी ते वादात सापडले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: येथील तिलक रस्त्याची पाहणी करतानाचे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाला दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी कथितपणे कानशिलात मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविवारी ते वादात सापडले आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेले तिलक नगरचे ‘आप’ आमदार जरनैल सिंह यांनी नव्याने तयार केलेल्या रस्त्याचा काही भाग हाताने उचकटून दाखवला आणि त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जवळच उभा असलेला एक तरुण या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करत असताना वर्मा यांनी त्याला कथितपणे कानशिलात मारली.

सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ही घटना कैद झाली असून, त्यावरून 'आप' नेत्यांनी वर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न विचारल्यानंतर मंत्र्यांचा संयम सुटला, असा आरोप पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला.

या आरोपांना उत्तर देताना वर्मा म्हणाले की, आम आदमी पक्षाकडून प्रसारित केला जात असलेला व्हिडिओ संदर्भाशिवाय दाखवला जात आहे. तसेच त्यांनी स्थानिक ‘आप’ आमदारावर रस्ता कंत्राटदाराकडे कमिशन मागितल्याचा आरोप केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ग्राहकांना ३० दिवसांचे रिचार्ज प्लॅन मिळणार; TRAI ने घेतला निर्णय

NTA चे कामकाज आता नव्या कार्यालयात; सुरक्षेची जबाबदारी CISF वर

१ ऑक्टोबरपासून AC, TV महागणार; ५ ते ८ टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता

निवडणूक आयोगाच्या बचावासाठी सत्ताधारी सरसावले; एनडीएचा विरोधकांवर हल्लाबोल

एल निनो संकट तीव्र होणार; पुढील वर्षाचीही तयारी करावी लागेल, फडणवीसांचा इशारा