Karnataka : शिवकुमारच होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री (Photo-X)
राष्ट्रीय

Karnataka : शिवकुमारच होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची शनिवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

Swapnil S

बंगळुरू : कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची शनिवारी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांचा राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीन जूनला त्यांचा शपथविधी होणार आहे.

विधानसौध येथे झालेल्या बैठकीत मावळते मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या बैठकीवर एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांनी निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

नवनिर्वाचित विधिमंडळ नेते शिवकुमार यांनी एक ठराव मांडून मावळते नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात केलेल्या सेवांचे कौतुक केले आणि बैठकीचा पाठिंबा मागितला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

उत्सवाला गालबोट! दोन ठार; २०० गोविंदा जखमी; अनेकांच्या डोक्याला-मणक्याला मार

पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद

आजचे राशिभविष्य, ६ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मुलांना आवडेल असा हटके स्नॅक; १५ मिनिटांत बनवा चॉकलेट पॉपकॉर्न

अंडी खाण्याआधी सावधान! 'या' संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका