राष्ट्रीय

मोठी बातमी! EC कडून राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा: महाराष्ट्रात सर्वाधिक ७ जागा, १६ मार्चला मतदान

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या १० राज्यांमधील ३७ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या जागांमध्ये शरद पवार...

Krantee V. Kale

राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या १० राज्यांमधील ३७ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

कोणत्या राज्यांमध्ये किती जागा?

महाराष्ट्र (७ जागा), ओडिशा (४ जागा), तेलंगणा (२ जागा), तामिळनाडू (६ जागा), छत्तीसगड (२ जागा), पश्चिम बंगाल (५ जागा), आसाम (३ जागा), हरयाणा (२ जागा), हिमाचल प्रदेश (१ जागा) आणि बिहार (५ जागा) या राज्यातील जागा रिक्त होणार आहेत. या जागा २ एप्रिल आणि ९ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत.

महाराष्ट्रातून कोणत्या जागा होणार रिक्त?

महाराष्ट्रातून शरद पवार, डॉ. भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धर्यशील पाटील, रजनी पाटील, रामदास आठवले यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तर, अभिषेक सिंघवी (काँग्रेस), साकेत गोखले (TMC), एम थंबीदुराई (AIADMK) आणि तिरुची शिवा (DMK) अशा प्रमुख खासदारांच्या जागा देशभरातून रिक्त होणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. १६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ५ मार्च अंतिम तारीख असेल. तर, ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि ९ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

सरकारी भूखंड ४९ वर्षांसाठी भाड्याने मिळणार; सरकारकडून जुन्या धोरणात सुधारणा

शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

युद्धविराम पण तात्पुरता; अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता