सणासुदीत ई-कॉमर्सला मोठी मागणी; ऑनलाइन खरेदीच्या स्पर्धेला नवे वळण; क्विक कॉमर्सचा विस्तार 
राष्ट्रीय

सणासुदीत ई-कॉमर्सला मोठी मागणी; ऑनलाइन खरेदीच्या स्पर्धेला नवे वळण; क्विक कॉमर्सचा विस्तार

भारतातील ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स (जलद डिलिव्हरी) प्लॅटफॉर्म्स आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स (जलद डिलिव्हरी) प्लॅटफॉर्म्स आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होत आहेत. ग्राहकांचा प्रीमियम (उच्च दर्जाच्या) उत्पादनांकडे वाढणारा कल आणि त्याच वेळी किमतीबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांची सवलतींची शोधमोहीम यामुळे बाजारात मूल्याच्या दृष्टीने चांगली वाढ आणि खर्च करण्याच्या विविध पद्धती पाहायला मिळतील, असा अंदाज उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

ई-टेलिंगमधील वाढीचा मुख्य इंजिन ठरलेल्या 'क्विक कॉमर्स'चा वापर आता रोजच्या किराणा सामानापुरता मर्यादित राहिला नसून फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौंदर्य प्रसाधनांच्या खरेदीकडे वेगाने विस्तारत आहे. अलीकडील सणासुदीच्या खरेदीत मिळालेल्या यशाच्या बळावर या हंगामात क्विक कॉमर्सचा हा विस्तार आणखी गती घेण्याची शक्यता आहे.

रिटेल तंत्रज्ञान कंपनी फाइंडच्या मुख्य व्यवसाय अधिकारी रागिणी वर्मा यांच्या मते, मागणी आता केवळ दिवाळीपुरती मर्यादित न राहता आधीपासूनच सुरू होत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्व-नवरात्रीच्या डी२डी ऑर्डर्समध्ये वर्षागणिक १६% वाढ झाली होती.

सवलतींमुळे सणासुदीच्या काळात होणाऱ्या मोठ्या खरेदीनंतर डिसेंबर-जानेवारीचा काळ काहीसा मंद राहू शकतो; तरीही स्मार्टफोन आणि उपकरणांसारख्या श्रेणींमध्ये जुन्या वस्तू बदलून नवीन घेण्याची (रिप्लेसमेंट) खरी गरज असल्याने ही मंदी केवळ बाजारपेठेचे सामान्यीकरण असेल, असा निष्कर्ष निमकर यांनी काढला आहे.

  • ई-कॉमर्स बाजार :२०३० पर्यंत ३४५ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज (१८.४% वार्षिक चक्रवाढ वाढ)

  • किरकोळ खर्चातील हिस्सा : दशकाच्या अखेरपर्यंत एकूण किरकोळ खर्चात ई-कॉमर्सचा हिस्सा १० ते १२ टक्के असेल.

  • ऑनलाइन ग्राहक संख्या : २०३० पर्यंत ४२० ते ४४० दशलक्ष (४२ ते ४४ कोटी) ग्राहक ऑनलाइन खरेदी करतील.

रोजगार निर्मिती :

  • ॲमेझॉन इंडिया : ४०० हून अधिक शहरांमध्ये १.६ लाखांपेक्षा जास्त हंगामी रोजगाराच्या संधी.

  • मीशो : १० लाखांहून अधिक अप्रत्यक्ष हंगामी रोजगाराच्या संधी

(स्रोत: इन्फिसम रिपोर्ट कंपनी)

गैर-मेट्रो शहरांचे वर्चस्व :

स्नॅपडीलच्या एकूण विक्रीपैकी ८० टक्क्यांहून अधिक विक्री गैर-मेट्रो भागांतून होते. राखीच्या सणात मीशोच्या ७३% ऑर्डर्स गैर-मेट्रो बाजारांतून आल्या होत्या. इन्फिसमच्या अहवालानुसार ६६% नव्या डी२डी ऑर्डर्स टियर-२, टियर-३ शहरांमधून येत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बाप्पा आम्हाला पाव, पण फुले खाणार भाव! गणेशोत्सवात फुलांचे दर वाढणार

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त गणपती 'विशेष गाड्या'; पनवेल-चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवा, LTT आणि मडगाव दरम्यान ४ गाड्या

मुंबईत सप्टेंबरमध्येही पाऊस रुसणार

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र'; अधिकाऱ्यांना पुढची जबाबदारी कामगिरीनुसार, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य

महाराष्ट्र स्वतंत्र डेटा सेंटर धोरण तयार करणार