राष्ट्रीय

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे पुन्हा समन्स

Swapnil S

रांची : सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना नवीन पत्र जारी केले आहे, त्यांना आता पुढील आठवड्यात मनी लाँड्रिंग प्रकरणात पुन्हा तपासात उपस्थित होण्यास सांगितले आहे. या संबंधात अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, सोरेन यांना २९ जानेवारी किंवा ३१ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपलब्ध आहोत की नाहीत, ते स्पष्ट करण्यास सांगितले आहे. केंद्रीय एजन्सीने यापूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना २७ ते ३१ जानेवारी दरम्यान कोणत्याही तारखेला चौकशीत सामील होण्यास सांगितले होते. परंतु कोणताही अधिकृत प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आता नवीन पत्र-कम-समन्स जारी केले आहे. ते सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस