राष्ट्रीय

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर ईडीचे छापे

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात, ईडीने शनिवारी सोरेन यांना सातव्यांदा समन्स बजावले होते

Swapnil S

रांची : झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रांची आणि राजस्थानमधील १० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रेस सल्लागार अभिषेक प्रसाद यांचा समावेश आहे.

हजारीबागचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र दुबे आणि साहिबगंजचे उपजिल्हाधिकारी राम निवास यांच्यावरही कारवाई झाली आहे. राजस्थानमधील राम निवासच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात येत आहे. यासोबतच विनोद कुमार नावाच्या आरोपीच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. रोशन खोडनिया भाई, पिस्का मोड, रातू रोड, रांची, देवघरचे माजी आमदार पप्पू यादव, अभय सरोगी, कोलकाता येथील अवधेश कुणार यांच्या घरांचीही ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत. या सर्वांवर अटकेची टांगती तलवार आहे. हे सर्व लोक सीएम हेमंत सोरेन यांच्या जवळचे मानले जातात.

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात, ईडीने शनिवारी सोरेन यांना सातव्यांदा समन्स बजावले होते. या समन्सनुसार सोरेन यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. “आम्ही तुम्हाला मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम ५० अंतर्गत तुमचे म्हणणे नोंदवण्याची ही शेवटची संधी देत ​​आहोत. ही नोटीस किंवा समन्स मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे,” असे ईडीने नोटिशीत म्हटले आहे.

साहेबगंज जिल्ह्यातील बेकायदेशीर खाण प्रकरणाशी संबंधित मनीलाँड्रिंगच्या आरोपांवर सोरेन यांची चौकशी केली जात आहे. खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाचे प्रभारी असताना हेमंत सोरेन यांनी २०२१ मध्ये स्वत:साठी खाण लीजवर घेऊन निवडणूक नियमांचे उल्लंघन केले आहे, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. परंतु, सोरेन यांनी हा आरोप नाकारला आहे.

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...