राष्ट्रीय

धुक्यांमुळे अमृतसर-दिल्ली महामार्गावर भीषण अपघात; १ मृत्यू तर १२ जण जखमी

या अपघातामध्ये 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे.

नवशक्ती Web Desk

संपूर्ण देशभरात थंडीची चाहूल सुरु झाली आहे. तसंच देशभरात प्रदूषणाचे देखील प्रमाण वाढले आहे. अनेक राज्यात पहाटेची धुक्ये पडायला सुरुवात झाली आहे. आता याचा धुक्यामुळे अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत. धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाल्याने अमृतसर दिल्ली महामार्गावर अनेक वाहने एकमेंकावर आदळली आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. पंजाबमधील खन्ना येथे ही दुर्घटना घडली आहे. या मार्गावर धडकलेल्या आणि खराब झालेल्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना येथील खन्ना भागात अनेक वाहने एकमेकांवर आदळली आहेत. पहाटेच्या या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी थांबलेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे.

या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणांत जीवितहानीसोबतच मोठ्या संख्येने आर्थिक हानीही झाल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. या अपघातामध्ये 100 वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Nepal Floods: महाराष्ट्रातील ८० जण अडकले; केवळ ४-५ जणांशीच संपर्क, मंत्री महाजनांची माहिती; राज्य सरकारकडून हेल्पलाईन सुरू

साखरेचे दर चढेच; देशात सरासरी दर ६५ रुपये किलो

Nepal Floods: भारत नेपाळच्या मदतीला; ३७.५ टन मदतसाहित्य रवाना, १६० हून अधिक मृत्यू, ८०० जणांचा अद्याप ठाव नाही

Mumbai : रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांसाठी गणवेश अनिवार्य; मुंबई विभागातील रेल्वे स्टॉल्ससाठी सुधारित नियमावली लागू; पश्चिम रेल्वेचा निर्णय

मानवासाठी ४० टक्के नोकऱ्या राखीव ठेवा; अमेरिकन उद्योगपती बिल गेटस् यांचे आवाहन