सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली 
राष्ट्रीय

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

उत्तर प्रदेशातील एका तरुणाने आपल्या १९ वर्षीय सख्ख्या बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली. हत्या केल्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून आरोपी थेट पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.

Mayuri Gawade

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून धक्कादायक ऑनर किलिंगची घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या १९ वर्षीय सख्ख्या बहिणीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि स्वतः पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. मृत तरुणीचे नाव रंजू यादव (वय १९) असून आरोपी भाऊ संदीप यादव (वय २२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अवघ्या ४४ दिवसांपूर्वी झाले होते लग्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजूचे १ मे २०२६ रोजी अजय यादव उर्फ पिंटू याच्यासोबत लग्न झाले होते. मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. त्यामुळे संदीप तिला सासरहून माहेरी घेऊन येत होता. दरम्यान, रंजू दुसऱ्या जातीतील एका तरुणाच्या संपर्कात असल्याचा संशय संदीपला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

जंगलात भेटल्याचा संशय

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण जवळच्या जंगल परिसरात असल्याची माहिती संदीपला मिळाली. त्यानंतर तो तेथे गेला असता रंजू आणि तो तरुण एकत्र दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. तरुण तेथून पळून गेल्यानंतर संतापलेल्या संदीपने रंजूचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

मृतदेह विहिरीत फेकला

हत्या केल्यानंतर आरोपीने बहिणीचा मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला. त्यानंतर तो थेट पोलिस चौकीत गेला आणि संपूर्ण घटनेची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

आरोपी अटकेत, तपास सुरू

पोलिसांनी आरोपी संदीप यादव याला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तसेच घटनास्थळावरून पळून गेलेल्या तरुणाचाही शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवघ्या ४४ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा स्वतःच्या भावाकडून झालेला खून हृदयद्रावक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO