राष्ट्रीय

यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण आज दुपारी; पण, भारतात दिसणार का?

यंदाच्या वर्षीचे (२०२६) पहिले सूर्यग्रहण मंगळवारी लागणार असून भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी ३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजेपर्यंत सुटेल. जवळपास चार तास ३० मिनिटे या खगोलीय घटनेचा प्रभाव राहणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षीचे (२०२६) पहिले सूर्यग्रहण मंगळवारी लागणार असून भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी ३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजेपर्यंत सुटेल. जवळपास चार तास ३० मिनिटे या खगोलीय घटनेचा प्रभाव राहणार आहे.

भारतात दिसणार नाही; त्यामुळे सुतककाळ नाही

हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने देशात कोणतेही शुभकार्य किंवा दैनंदिन दिनचर्येवर ग्रहणामुळे निर्बंध नसतील.

वैज्ञानिक भाषेमध्ये याला ‘वलयाकार सूर्यग्रहण’ असे म्हणतात. या काळामध्ये चंद्र पृथ्वीपासूनदूर असल्याने तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकणार नाही, परिणामी सूर्याचा मधील भाग काळवंडला जाईल आणि कडेच्या बाजूला एक तेजस्वी प्रकाशवलय दिसेल. हे दृश्य सोन्याच्या अंगठीप्रमाणे किंवा आगीच्या कड्यासारखे (रिंग ऑफ फायर) दिसते.

ग्रहणाची वेळ

या ग्रहणाचा सर्वात महत्त्वाचा क्षण केवळ २ मिनिटे २० सेकंदांचा असेल, या कालावधीत सूर्याचा ९६ टक्के भाग चंद्र व्यापणार आहे. हे ग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका खंडात स्पष्टपणे दिसेल. त्याबरोबर दक्षिण आफ्रिका, टांझानिया, झांबिया, झिम्बाब्वे या आफ्रिकन देशांमध्ये आणि दक्षिण अमेरिकेतील आर्जेंटिना व चिलीच्या काही भागांत हे ग्रहण अंशत: पाहता येणार आहे.

ठाण्यात नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटर चोरीला; गेल्या आठ वर्षांतील घटना, झोपडपट्टीत सर्वाधिक चोरी

Pune : कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mira-Bhayandar : ५.१४ लाख मतदारांपैकी २.१३ लाख नोंदी बाद

दहशतवादाविरुद्ध लढ्याचे मोदींचे आवाहन; शांघाय सहकार्य संघटनेत पाकिस्तानवर जोरदार टीका

'सहा लाख' मतदार वगळले; २ लाख ७० हजार मतदारांचा 'पत्ता'च नसल्याचे उघड, निवडणूक विभागाचा दावा