राष्ट्रीय

कोलकातामधील पीडितेवर सामूहिक बलात्कार ? शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत डॉक्टरचा दावा

कोलकातामधील शासकीय रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे देश हादरला असतानाच या डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा एका डॉक्टरने केला असून त्यासाठी शवविच्छेदन अहवालाचा हवाला दिला आहे.

Swapnil S

कोलकाता : कोलकातामधील शासकीय रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे देश हादरला असतानाच या डॉक्टरवर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा एका डॉक्टरने केला असून त्यासाठी शवविच्छेदन अहवालाचा हवाला दिला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने त्याचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले असून, सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती उजेडात येऊ लागली आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे.

दरम्यान, या बलात्कार व हत्या प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी असल्याचा दावा अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी केला आहे. या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल आपण वाचला आहे. पीडित तरुणीवर एकापेक्षा जास्त जणांनी बलात्कार (सामूहिक बलात्कार) केल्याची शक्यता वर्तवली आहे, असे डॉ. गोस्वामी यांनी म्हटले आहे. पीडितेच्या शरीरावर अनेक खोल जखमा आहेत त्यावरून हे एका व्यक्तीचे काम नाही, असे स्पष्ट होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासन करत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर सुरक्षित नाहीत, तर कोणत्या विश्वासाने पालक आपल्या मुलींना येथे शिकायला पाठवणार, निर्भया प्रकरणानंतर अनेक कठोर कायदे तयार झाले, तरीही गुन्हेगारांना रोखण्यात अपयश का येत आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

उन्नाव प्रकरण, कठुआ प्रकरण आणि आता कोलकाता येथील प्रकरणांमुळे महिलांविरोधात घडणाऱ्या घटनांमुळे प्रत्येक वर्गाने आणि पक्षांनी एकत्र येऊन सारासार विचार करून ठोस उपाय शोधायला हवा, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.

आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न - राहुल गांधी

कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रथमच भाष्य केले. पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीचा बचाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी