चांदीबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता आयातीवर कठोर निर्बंध संग्रहित छायाचित्र - FPJ
राष्ट्रीय

चांदीबाबत सरकारचा मोठा निर्णय; आता आयातीवर कठोर निर्बंध

मौल्यवान धातूंच्या आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी चांदीच्या आयातीवरही कठोर निबंध लागू केले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : मौल्यवान धातूंच्या आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने शनिवारी चांदीच्या आयातीवरही कठोर निबंध लागू केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सोने आणि प्लॅटिनम मिश्रित चांदीसह सर्व प्रकारच्या चांदीच्या आयात धोरणात बदल करण्यात आला आहे. चांदीची आयात आता मुक्त श्रेणीतून काढून प्रतिबंधित श्रेणीत समाविष्ट करण्यात आली असून हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने १३ मे रोजी मौल्यवान धातूंच्या आयात शुल्कात ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ केली होती. त्यानंतर आता चांदीच्या आयातीवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, प्रतिबंधित श्रेणीत आलेल्या वस्तूंची आयात करण्यासाठी आता आयातदारांना सरकारकडून विशेष परवाना घेणे अनिवार्य असणार आहे.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता