फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले gurugram-home-guard-abuses-auto-driver-over-free-ride-demand-viral-video
राष्ट्रीय

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

गुरुग्राममध्ये फुकटचा प्रवास नाकारल्याने होमगार्ड कर्मचाऱ्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. सोशल मीडियावरील संतापानंतर संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून हटवून विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली.

Mayuri Gawade

हरियाणातील गुरुग्राम येथे एका होमगार्ड कर्मचाऱ्याने रिक्षाचालकाकडे मोफत प्रवासाची मागणी केल्याचा आणि ती नाकारल्यानंतर त्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून हटवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.

ॲपवरील बुकिंग रद्द करण्यास चालकाचा नकार

व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, यूनिफॉर्म मधील होमगार्ड कर्मचारी एका रिक्षामध्ये बसला आणि त्याने चालकाला इच्छितस्थळी सोडण्यास सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने आधीच ॲपद्वारे प्रवाशाचे बुकिंग स्वीकारले असल्याने तो संबंधित प्रवाशाला घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले. बुकिंग रद्द केल्यास प्रवाशाची गैरसोय होईल आणि आपल्या कामावरही परिणाम होईल, असे त्याने स्पष्ट केले.

नकार दिल्यानंतर शिवीगाळ केल्याचा आरोप

यानंतर होमगार्ड कर्मचाऱ्याने संतापून रिक्षाचालकाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. व्हिडीओमध्ये रिक्षाचालकाने आपण केवळ आपले काम करत असताना आपल्याशी अशा प्रकारे गैरवर्तन का केले जात आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

व्हिडीओच्या शेवटी रिक्षाचालकाने कॅमेऱ्यासमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, तो ॲपवरील निश्चित बुकिंगसाठी प्रवाशाला घेण्याच्या ठिकाणी पोहोचला असताना होमगार्ड कर्मचारी रिक्षामध्ये बसला आणि मोफत प्रवासाची मागणी करू लागला. आपण नम्रपणे नकार दिल्यानंतर त्याने वारंवार शिवीगाळ केल्याचा दावा चालकाने केला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर संताप; कारवाईची मागणी

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा निषेध केला. सार्वजनिक सेवेत असलेल्या व्यक्तीने मोफत प्रवासाची अपेक्षा ठेवणे आणि अधिकाराचा गैरवापर करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

गुरुग्राम पोलिसांची तातडीने कारवाई

दरम्यान, गुरुग्राम पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत व्हिडीओतील व्यक्ती होमगार्ड कर्मचारी असल्याची पुष्टी केली. संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून हटवण्यात आले असून त्याच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. "सामान्य नागरिकांची सेवा, सुरक्षा आणि मदत करण्यासाठी गुरुग्राम पोलीस कटिबद्ध आहेत," असेही निवेदनात म्हटले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...