ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी 
राष्ट्रीय

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या आणि निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांच्या संमतीशिवाय एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप असलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या आणि निवडणूक आयोगाच्या दोन आयुक्तांच्या संमतीशिवाय एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप असलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर राकेश कुमार सिंह आणि वकील शैलेंद्र मणि त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या याचिकांवर ही सुनावणी पार पडणार आहे. कुमार यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या सहमतीशिवाय घेतलेले निर्णय, मार्गदर्शक तत्त्वे आणि सॉफ्टवेअरमधील बदल यांना या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे.

पाटण्याचे रहिवासी राकेश कुमार सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने हे तपासावे अशी विनंती केली आहे, की मुख्य निवडणूक आयुक्तांनी कायदेशीररित्या संपूर्ण निवडणूक आयोगाचे असणारे अधिकार वैयक्तिकरित्या वापरले आहेत का? जर असे असेल, तर ते कृती अनधिकृत घोषित करून योग्य कायदेशीर कारवाई करावी.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

पराभवाच्या द्वेषातून विरोधक आले एकत्र..!

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ५ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

फेशियल केलं, पण ग्लो २-३ दिवसांतच गायब? 'या' चुका अजिबात करू नका